आदित्य- एल वन नवीन वर्षात लॅगरेंज पॉईंट-एल वनवर पोहचणार
भारताचे सूर्यमोहिमेतील अंतराळयान आदित्य- एल वन हे सध्या त्याच्या अंतिम टप्यात असून ७ जानेवारी २०२४ मध्ये ते ‘लॅगरेंज पॉईंट एल वन’ या लक्ष्यापर्यंत पोहचणार आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे साउंडिंग रॉकेट प्रक्षेपणाच्या ६० व्या वर्षाच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना सोमनाथ म्हणाले की, आदित्य एल वन ही सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. ७ जानेवारी २०२४ रोजी आदित्य-एल वनच्या ‘लॅगरेंज पॉईंट एल वन’वर पोहचण्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, “या मोहिमेच्या माध्यमातून ‘इस्रो’सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्याच गोष्टींचा अभ्यास करणार आहे. यासोबतच’लॅगरेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास आदित्य एल-वन करणार आहे. याशिवाय सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील. सूर्याचे वेगवेगळ्या थरांबद्दल देखील माहिती मिळेल,अशी अपेक्षा आहे.”