पनवेल महापालिकेत नोकरीची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड
Panvel Mahanagarpalika Bharti 2023 : पनवेल महानगरपालिकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे महानगरपालिकेने ‘सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त लेखाधिकारी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक’ पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीसाठी हजर राहू शकतात. पनवेल महानगरपालिका भरती २०२३ साठी आयोजित केलेल्या मुलाखतीची तारीख, आवश्यक पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
पनवेल महानगरपालिका भरती २०२३
पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त लेखाधिकारी, सेवानिवृत्त लेखा परीक्षक
एकूण पदसंख्या – २३
पात्रता निकष – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी भरतीची मूळ जाहिरात अवश्य पाहा.
नोकरी ठिकाण – पनवेल
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल
मुलाखतीची तारीख – ४ डिसेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – https://panvelcorporation.com/
महत्वाच्या सूचना –
- भरती मुलाखतीद्वारे होणार आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
- मुलाखतीची तारीख ४ डिसेंबर २०२३ आहे.
- मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
भरती संबंधित अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
https://drive.google.com/file/d/1XB41WCEFxp34wt_ElAN2QJhV4u2J4XGi/view