भारतीय वंशाच्या १३ वर्षीय ईश्वरने स्वीडनमध्ये जिंकले सुवर्णपदक

MPSC TECH
0

 


भारतीय वंशाच्या १३ वर्षीय ईश्वरने स्वीडनमध्ये जिंकले सुवर्णपदक

दक्षिण-पूर्व इंग्लंडमधील भारतीय वंशाच्या १३ वर्षीय ईश्वर शर्माने स्वीडनमध्ये युरोपियन योग क्रीडा स्पर्धामध्ये आपली असामान्य योग प्रतिभा दाखवत सुवर्णपदक जिंकले. नुकतेच  स्वीडनमधील मालमो येथे आंतरराष्ट्रीय योग क्रीडा महासंघाने योग क्रीडास्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी १२-१४ वयोगटात ईश्वरने सहभाग घेतला होता. त्यामध्ये त्याने युरोप कप २०२३ चा मानकरी ठरला.

इंग्लंडमधील सेव्हनॉक्स, केंट येथे राहाणार्या ईश्वरने वडिलांच्या नेतृत्वाखाली वयाच्या अवघ्या ३ वर्षांपासूनच योगाभ्यास करण्यास सुरुवात केली. यापूर्वीही त्याने अनेक जागतिक योग स्पर्धा जिंकल्या आहेत. कोविड लॉकडाऊन दरम्यान ईश्वरने १५ देशांतील ४० मुलांसाठी दररोज योगाचे वर्ग घेतले होते. यासाठी त्याला तत्कालीन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या हस्ते पॉइंट्स ऑफ लाईट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. योगासाठी दिलेल्या योगदानाबद्दल इश्वरने पाच जागतिक अजिंक्यपद आणि ब्रिटिश नागरिक युवा पुरस्कार जिंकला आहे. योगाबद्दल जनजागृती करण्याचे कामही इश्वर याने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)