राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी मोहोर! निखिल महाजन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

MPSC TECH
0

 


राष्ट्रीय पुरस्कारावर मराठी मोहोर! निखिल महाजन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. या पुरस्कारांमध्ये निखिल महाजन याला गोदावरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर ‘एकदा काय झालं ‘ हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे. चंद्रकांत कुलकर्णी यांच्या ‘चंद साँसे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कौटुंबिक चित्रपट या प्रकारांत पुरस्कार मिळाला आहे.
निखिल महाजन दिग्दर्शित ‘गोदावरी’ सिनेमाने अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात मोहोर उमटवली आहे. आता राष्ट्रीय पुरस्कारावरही त्याने आपले नाव कोरले आहे. जिवंत माणसाला मरण समजावणारा आणि मरणाऱ्या माणसाला खऱ्या अर्थाने जगण्याची परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे. यात गोदावरी नदीचा काठ हा चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ‘रॉकेट्री’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. अल्लू अर्जूनला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी) आणि क्रीती सेनन (मिमी) यांना विभागून देण्यात आला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. पंकज त्रिपाठी (मिमी), सर्वोत्कृष्ट सहअभिनेता, पल्लवी जोशी (काश्मीर फाइल्स) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली आहे.

अन्य पुरस्कारप्राप्त चित्रपटांची नावे –

सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपट – एक था गाव (गढवाली आणि हिंदी), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकबकुअल मतियानी, स्माइल प्लीज (हिंदी), कौटुंबिक मूल्यांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – चांद सांसे (हिंदी), सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर – बिट्टू रावत, सर्वोत्कृष्ट अन्वेषणात्मक चित्रपट – लुकिंग फॉर चालान (इंग्रजी), सर्वोत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट – सिरपिगालिन सिपांगल (तमिळ), सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट – मिठू दी (इंग्रजी), थ्री टू वन (मराठी आणि हिंदी), सर्वोत्कृष्ट पर्यावरण चित्रपट – मुन्नम वालावू (मल्याळम). सर्वोकृष्ट चित्रपट -होलसम एंटरटेनमेंट – आरआरआर, स्पेशल जूरी अवॉर्ड- शेरशाह.
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- सरदार उधम सिंह, सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – छेल्लो शो, सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – ७७७ चार्ली, सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर, सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – होम, सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – कदासी विवासई, सर्वोत्कृष्ट तेलूगू चित्रपट – उप्पेना
.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)