जगातील सर्वात दु:खी हत्तीचा मनिला प्राणी संग्रहालयात मृत्यू
जगातील सर्वात दुःखी म्हणून ओळखल्या जाणार्या माली नावाच्या हत्तीचा फिलीपाइन्समधील मनिला प्राणिसंग्रहालयात मृत्यू झाला. मनिलाचे महापौर हनी लकुना यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वयाबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र, तो ४३ वर्षांचा असावा, असे मानले जाते.
28 नोव्हेंबर ला दुपारी ३.४५ वाजता मालीचे निधन झाले. जगातील सर्वात दु:खी हत्ती म्हणून त्याला ओळखले जायचे. फिलीपाइन्समधील मनिला प्राणीसंग्रहालयात माली एकाकी जीवन जगत होता. ज्यामुळे त्याच्याकडे अवघ्या जगाचे लक्ष वेधले गेले. मालीने मनिला प्राणीसंग्रहालयात अनेक वर्षे एकाकीपणात घालवली.
(MPSC STUDY, MPSC Current Affairs)