हिंदू कोड बिल
पार्श्वभूमी : भारतात प्राचीन काळापासून पुरुषप्रधान संस्कृती रूढ होती व समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान होते. हिंदू कोड बिल (हिंदू सहिंता विधेयक) हे स्त्रीयांच्या सशक्तीकरणासाठी एक पाऊल होते.
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा हिंदू समाजात पुरुष आणि महिलांना घटस्पोटाचा अधिकार नव्हता. पुरूषांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याचे स्वतंत्र होते परंतु विधवांना दुसरे लग्न करु शकत नव्हती. विधवांना संपत्तीपासून सुद्धा वंचित ठेवण्यात आले होते.
हिंदू धर्मातील "मिताक्षरा" (दायभाग आणि मिताक्षरा या संस्कृत ग्रंथात वारसा हक्काबद्दल मांडणी आहे.) नुसार वारसा हक्काने संपत्ती मुलांकडेच हस्तांतरण होत असे.
बाबासाहेबांनी इ.स. 1947 पासून सतत 4 वर्षे 1 महिना 26 दिवस काम करून हिंदू कोड बिल तयार केले होते.
संसदेत सादर : हिंदू कोड बील प्रथमत 24 फेब्रुवारी 1949 रोजी संसदेत मांडले गेले परंतु त्यावर कोणतीही संमती झाली नाही.
तरतुदी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बीलात सर्वसामान्य महिलांसोबतच विधवा व तिच्या मुलींना देखील समाविष्ट केले. याचाच अर्थ हिंदू कोडबीलातून त्यांनी मुलींना मुलांबरोबरीचा वारसा हक्कात दर्जा देवू केला.
हिंदू कोड बिलात महिलांना तिच्या पतीच्या मालकीची संपत्ती विकण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला.
हिंदू धर्मात त्याकाळी असलेल्या आणखी एका कुप्रथेनुसार दत्तक घेतलेल्या मुलाला संपत्तीचा अधिकार नसे. तो अधिकार प्रदान करण्याचा हिंदू कोडबीलात मांडला.
हिंदू कोड बिलात बहुपत्नीत्व प्रथेला मज्जाव करून एक पत्नीत्वाचा पुरस्कार केला
भारतीय स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून केला होता.
हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक खालीलप्रमाणे :
जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या (स्त्री आणि पुरुष दोघांच्याही) मालमत्तेच्या हक्कांबाबत
मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार
पोटगी
विवाह
घटस्फोट
दत्तकविधान
अज्ञानत्व
पालकत्व
कायदेमंत्री पदाचा राजीनामा : हे बिल आंबेडकर मंत्रीपदी असताना मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.
हिंदू कोड बिलाला मंजुरी : हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी नेहरूंनी मंजूर करून घेतले. इ.स. 1955-56 मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे खालीलप्रमाणे:
हिंदू विवाह कायदा
हिंदू वारसाहक्क कायदा
हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा
हिंदू दत्तक व पोटगी कायदा