प्रबोधनयुग :

MPSC TECH
0

 आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो.

प्रबोधनयुग : युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे १३ वे ते १६ वे शतक प्रबोधनयुग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्म सुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळालाप्रबोधनयुगअसे म्हणतात. प्रबोधनयुगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रां त ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधनकाळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्मा ऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. क्षेत्रांत आपणांस प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधनकालीन कला व साहित्यामधून मानवी भावभावना अणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. ..१४५० च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहचू लागले.

 


धर्म सुधारणा चळवळ : स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथलि क चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ख्रिस्ती धर्म गुरू कर्मकांडांचे स्तोम माजवत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत. या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिलाधर्म सुधारणा चळवळअसे म्हणतात. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धि प्रामाण्य या तत्त्वांना महत्त्व प्राप्त झाले.

 

भौगोलिक शोध : ..१४५३ मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझन्टा इन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टॅन्टि नोपल (इस्तं बूल) जिंकून घेतले. या शहरातून आशिया व युरोप यांना जोडणारे खुश्की चे व्यापारी मार्ग जात. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशिया कडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. यातूनच भौगोलिक शोधांचे नवे पर्व सुरू झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)