स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे भरती

MPSC TECH
0

केंद्र सरकारमध्ये किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना हिंदी/ इंग्रजीसोबत मराठी माध्यमातून परीक्षा देऊन नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी. 

केंद्र सरकारमध्ये किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना हिंदी/ इंग्रजीसोबत मराठी माध्यमातून परीक्षा देऊन नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी. स्टाफ सिलेक्शन कमिशन – ‘मल्टि टास्किंग नॉन-टेक्निकल स्टाफ ( MTS) आणि हवालदार ( CBIC & CBN) परीक्षा २०२४’ जाहीर. वेतन – पे-मॅट्रिक्स लेव्हल-१ अंदाजे दरमहा रु. ३३,८००/-.

केंद्र सरकारच्या देशभरातील विविध खात्यांमध्ये/कार्यालयांमध्ये ‘मल्टि टास्किंग स्टाफ’ (mts) च्या एकूण ४,८८७ आणि CBIC CBN मधील ‘हवालदार’च्या एकूण – ३,४३९ अशी एकूण ८,३२६ ग्रुप ‘सी’ पदांची भरती. रिक्त पदांचा नेमका तपशिल https://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (Candidates corner ; Tentative vacancy). काही पदे अपंगांसाठी राखीव आहेत. रिक्त पदांच्या १० टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव आहेत. (एकूण २८७)

पात्रता : (दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी) १० वी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी – MTS पदांसाठी १८ ते २५ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९९ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.)

CBIC/ CBN मधील हवालदार आणि MTS च्या काही पदांसाठी १८ ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २ ऑगस्ट १९९७ ते १ ऑगस्ट २००६ दरम्यानचा असावा.)

(उच्चतम वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे; अजा/ अज – ५ वर्षे; अपंग – खुला – १० वर्षे/ इमाव – १३ वर्षे/ अजा/ अज – १५ वर्षे) (घटस्फोटीत/ परित्यक्ता/ विधवा/ पुनर्विवाह न केलेल्या महिला – ३५ वर्षेपर्यंत, अजा/ अजच्या परित्यक्ता/ विधवा महिला – ४० वर्षेपर्यंत) (केंद्र सरकारमधील नागरी कर्मचारी (किमान सेवा ३ वर्षांची) – ४० वर्षेपर्यंत, अजा/अजचे केंद्र सरकारमधील कर्मचारी – ४५ वर्षेपर्यंत.)

उमेदवारांकडे दि. ३१ जुलै २०२४ रोजी नॉन-क्रिमी लियर दाखला धारण करणे आवश्यक.

अर्जाचे शुल्क : १००/- (अजा/ अज/ महिला/ दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) ऑनलाइन पद्धतीने फी दि. १ ऑगस्ट २०२४ (२३.०० वाजे) पर्यंत भरता येईल.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली व दमण व दिव या राज्यांचा/ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो.

परीक्षा केंद्र : अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, पणजी इ. (उमेदवारांनी अर्ज करताना तीन केंद्रांसाठी पसंती क्रम द्यावयाचा आहे.)

निवड पद्धती : MTS पदांसाठी कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन ( CBE) सत्र-१ व सत्र-२; हवालदार पदांसाठी CBE आणि शारीरिक क्षमता चाचणी (PET)/ शारीरिक मापदंड चाचणी (PST) – कॉम्प्युटर बेस्ड् एक्झामिनेशन (CBE) ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस दोन सत्रांमध्ये घेतली जाईल. उइए परीक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये आयोजित केली जाईल.

सत्र – १ – (I) न्यूमरिकल अँड मॅथेमॅटिकल अॅबिलिटी – २० प्रश्न, ६० गुण. (II) रिझनिंग अॅबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग – २० प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे पूर्ण झाल्यावर सेशन-१ आपोआप बंद होईल. त्यानंतर सेशन-२ सुरू होईल.

सत्र – २ – (I) जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, ७५ गुण. (II) इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन – २५ प्रश्न, ७५ गुण, वेळ ४५ मिनिटे. सेशन-१ (सत्र-१) मध्ये चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. सेशन-२ मधील प्रत्येक चुकीच्या उत्तराला १ गुण वजा केला जाईल. CBE नंतर योग्य वेळी आन्सर कीज् जाहीर केल्या जातील. प्रश्नपत्रिका हिंदी/इंग्रजी, आणि मराठी, कोंकणी, कन्नड, गुजराती, तामिळ, तेलगू, ऊर्दू इ. १३ स्थानीय भाषेत छापली जाईल. उमेदवारांनी भाषेचा पर्याय ऑनलाइन अर्जात नोंद करणे आवश्यक.

कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन : CBE सत्र – १ व सत्र – २ मध्ये पात्रतेसाठी किमान गुण – खुला गट – ३० टक्के, इमाव/ ईडब्ल्यूएस – २५ टक्के व इतर कॅटेगरीजसाठी २० टक्के गुण आवश्यक. जे उमेदवार सत्र-१ मध्ये पात्र ठरतील त्यांचेच सत्र २ चे पेपर तपासले जातील.

MTS पदांसाठी राज्यनिहाय CBE सत्र-२ मधील गुणवत्तेनुसार निवड केली जाईल.

CBIC CBN मधील हवालदार पदांसाठी CBE मध्ये उत्तीर्ण झाल्यावर शारीरिक क्षमता चाचणी (PET) व शारीरिक मापदंड चाचणी (PST) देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल, PET/ PST मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची सत्र-२ मधील गुणवत्तेनुसार उउअ निहाय/ कॅटेगरीनुसार निवड केली जाईल.

शारीरिक क्षमता चाचणी : ( i) ( PET) – पुरुषांसाठी – १६०० मीटर अंतर १५ मिनिटांत चालणे. महिलांसाठी – १ कि.मी. अंतर २० मिनिटांत चालणे.

शारीरिक मापदंड चाचणी : ( ii) (PST) – पुरुष – उंची – १५७.५ सें.मी. (अनुसूचित जमाती ( ST) साठी उंची १५२.५ सें.मी.) छाती – ७६ ते ८१ सें.मी. महिला – उंची – १५२ सें.मी. ( ST साठी उंची १४९.५ सें.मी.), वजन – ४८ कि.ग्रॅ. (अजसाठी ४६ कि.ग्रॅ.) अर्ज भरण्यासाठी सविस्तर सूचना संकेतस्थळावरील जाहिरातीत Annexure- III आणि Annexure- IV मध्ये दिलेल्या आहेत.) त्या सूचना वाचून नीट समजून घेवून मगच ऑनलाइन अर्ज करावा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)